Finding Home Within Us (Marathi) by Yogita Chitte
आपला अंतर्मनाचा प्रवास हा केवळ आजच्या अनुभवांनी घडत नाही; तो बालपणातील आठवणी, प्रेम, वूंड्स आणि स्वतःबद्दलच्या खोल समजुतींमधून उलगडत जातो.
प्रौढ आयुष्यात जाणवणाऱ्या अनेक भावना; भीती, आत्मसंशय, भावनिक वेदना, नात्यांमधील संघर्ष आणि आपलेपणाच्या शोधाची ओढ, यांचा संबंध अनेकदा आपल्या सुरुवातीच्या अनुभवांशी जोडलेला असतो. परंतु याच अनुभवांमध्ये स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याची, हिलिंगची आणि अंतर्मनातील शक्ती पुन्हा जागृत करण्याची सुंदर संधी दडलेली असते.
फाइंडिंग होम विथिन अस, हे भावनिक हिलिंग आणि आध्यात्मिक जाणिवांचा एक सुंदर संगम आहे. हे पुस्तक बालपणीचे अनुभव आपल्या प्रौढ आयुष्यावर कसा प्रभाव टाकतात, पालकांमधील समंजस नातं मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी किती महत्त्वाचं असतं. आपले सकारात्मक विचार आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर होणारा प्रभाव समजून घेण्यास मदत करतं. आपण आपल्या खऱ्या स्वरूपाशी पुन्हा कसे जोडले जाऊ शकतो, याचा एक हळुवार प्रवास आहे माझ्या आई-वडिलांच्या प्रेमळ मार्गदर्शनाने व आशीर्वादाने आणि माझ्या हायर सेल्फच्या(Higher Self) इंट्यूशनने (Intuition)प्रेरित होऊन लिहिलेलं हे पुस्तक, हिलिंग, आत्मशोध आणि अंतर्मनातील शांततेचा शोध घेणाऱ्या प्रत्येकासाठी एक मनापासुनची भेट आहे.
तुमचा प्रवास कधीच स्वतःला बदलून दुसरं कोणी बनण्याचा नव्हता; तो आपल्या आत आधीपासून स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची आठवण होण्याचा, स्वतःला स्वीकारण्याचा आणि आपल्या हृदयात सदैव वसलेल्या त्या पवित्र घराकडे परतण्याचा प्रवास होता.
“जी शांतता, प्रेम आणि स्वीकृती आपण अनेकदा बाहेरच्या जगात शोधत असतो, ते खरं तर नेहमीपासून आपल्या स्वतःच्या अंतरंगातच वसलेले असतं. खरी यात्रा ही बाहेर काही शोधण्याची नसून, आपल्या अंतर्मनातील त्या पवित्र घराकडे परत येण्याची असते; जिथे आपल्या आत्म्याचं सत्य, प्रेम आणि शांतता सदैव अस्तित्वात असते. "
















