Sapiens and Sthitaprajna (Marathi) - सेपियन्स आणि स्थितप्रज्ञ by Ashwini Mokashi
"Sapiens and Sthitaprajna: A Comparative Study in Seneca’s Stoicism and the Bhagavadgita" या ग्रंथाचा सारांश असा आहे की सेनेका आणि भगवद्गीतेतील ज्ञानी व्यक्तीच्या संकल्पनेवर आणि सद्गुणी जीवन कसे जगावे या प्रश्नावर केलेला हा एक तुलनात्मक अभ्यास आहे. दोन्ही तत्त्वज्ञान परंपरा ज्ञान, सद्गुण, नैतिक निर्णय आणि कर्तव्य यांना महत्त्व देतात. तसेच, मानवी भावनांच्या अतिरेकापासून मुक्त असलेला संत (Sage) कसा असावा याचा विचार करतात. मनाचा समतोल आणि संयम राखल्यामुळे मनः शांती, संतुलन आणि अखेर आनंद साध्य होतो, असा दोन्ही परंपरांचा दावा आहे.
असे असून सुद्धा, गीतेत ध्यानाची आणि आध्यात्मिक साधनेची गरज अधिक मानलेली आणि स्पष्ट केलेली आहे, तर स्टोइक तत्त्वज्ञानात तर्कशक्तीचा वापर करून परिस्थितीचे विश्लेषण करण्यास प्राधान्य दिले जाते. दोन्ही परंपरा असे मानतात की आपल्या जन्मजात बुद्धिमत्तेचा वापर हा सद्गुण संपादन करण्यासाठी आणि आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे. ही तुलना प्राचीन पश्चिम आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. दोन्ही तत्त्वज्ञानाच्या अनुयायांसाठी त्यांच्यातील साम्य आणि भेद जाणून घेण्याचा हा एक चांगला मार्ग ठरू शकतो.
















